Tuesday 14 August 2012

तू हो तूच जीवनात काय आलीस
जीवनाचे दिशाचक्रच पालटले
सवय तर मला तू तुझी
माझ्या जन्मदिवसाप ासूनच लावलीस.... ....... (आई)
माझी सर्वात पहिली ओळख तूच होतीसन आई
रडत रडत मी ह्या जगात आलो
तेव्हा तू हसत होतीस
आणि त्या नंतरच्या माझ्या प्रत्येक रडगाण्यात
तू पण दुखी झालीस
माझी पहिली मैत्रीण बनलीस पण माझ्याशी रोज भांडलीस ...... (ताई)
तुझ्यावर झालेले लाड मला सहन नव्हते होत
पण माझ्यावर झालेले लाड तू सहन करायचीस
माझ्या हातांवर राखी बांधून रक्षेचे वचन मागायचीस
पण सर्व प्रकारच्या संकटांपासू नतूच वाचवायचीस
तारुण्यात पदार्पण करताच नजरेतून घडली तुझी भेट .....( प्रेयसी )
भेट माझ्या भावनांची तुझ्या भावनांशी झाली थेट
जग ज्याला प्रेम म्हणते त्याची प्रचीती तुझ्यामुळे झाली
जीव लावणे जपणे सांभाळून घेणे समजून घेणे
ह्यांची जाणीव पण तुझ्यामुळे च झाली
घराचा उंबरठा ओलांडून तू आयुष्यात आली ...... ( पत्नी )
सहजीवनाची व्याख्या तेव्हा मला कळाली
"संसार जवाबदारी " असे शब्द ऐकवून
मित्रांनी मला घाबरवले
पण तू पावला पावलावर साथ देवून
प्रत्येक परिस्थितीश ी लढायला शिकवले
बाबा संध्याकाळी लवकर घरी या.......... ......( कन्या )
येताना मला बाहुली आणा...
काय गोड आवाज तुझा आहे
ह्या जगात इतका सुंदर आवाज कुणाचाच नसेल
जो माझ्या लेकीचा आहे
कामावरून जेव्हा मी येतो दमून थकून
तुझा गोड चेहरा बघूनच सर्व थकवा जातो पळून
<><><><><> <><><><><>
खरच मुलाच्या रुपात जन्म मी घेतला पण स्त्रीने मला तिच्या इतक्या रुपात जपले
नसते तर माझ जीवन नक्कीच व्यर्थ गेले असते
स्त्री कन्या ताई आई प्रेयसी पत्नी
किती रूप एकाच माऊलीचे
जसे अमृतरूपी पाण्याचे रूप
नदीचे सागराचे
धबधब्याचे सरोवराचे
तलावाचे किवा पावसाचे
सर्व पाणीच पण रूप अनेक...... .......... ......


ANAMIK

3 comments: